Blog

First slide

युवा स्फूर्ती प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांना सनकॅप व स्कूलबॅग चे वाटप

2022-01-01

युवा स्फूर्ती प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. निरंजन रावसाहेब निर्मळ हे विविध उपक्रम राबवत असतात. आपल्या सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. पप्पू पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. जीवघेण्या उन्हाच्या तड़ाख्याचा बालगोपाळांना होणारा त्रास लक्षात घेऊन, त्यांचे या उन्हाच्या तड़ाख्या पासुन रक्षण करण्या करिता सनकॅप चे वाटप करण्याची कल्पना त्यांनी मांडली. त्याच प्रमाणे, या बालगोपाळांना त्यांच्या शालेय साहित्याची ने आण करणे सुसाध्य व्हावे, या करिता स्कूलबॅग चे वाटप करण्याचे ठरले. सदर उपक्रम रामवाडी परिसरातील परीस व क्षितिज बालभवन, लालटाकी येथील उत्कर्ष बालभवन, आणि सिद्धार्थ नगर मधील डॉ. कलाम बालभवन या शाळांमध्ये राबवण्यात आला. सदर उपक्रमा अंतर्गत या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सनकॅप व स्कूलबॅग चे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमामूळे या सर्व विद्यार्थ्यांना उन्हाचा होणारा त्रास कमी करणे शक्य झाले, आणि त्यांना शालेय शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहन मिळाले. सनकॅप व स्कूलबॅग मिळाल्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या आनंदामुळेच सदर उपक्रम अत्यंत संस्मरणीय झाला. मा. श्री. पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी स्वामी उद्योग समूहाचे संस्थापक मा. श्री. विकीशेठ तिवारी तसेच मा. श्री. पप्पू पाटील उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्या करिता, रामवाडी मित्र मंडळ व आर. डब्ल्यू. ग्रुप चे मा. श्री. राजू दिनकर, श्री. सूरज शेटे, श्री. गणेश ससाणे, श्री. रोहित सिंघ, व श्री. संग्राम माने यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमा करीता रामवाडी परिसरातील परीस व क्षितिज बालभवन, लालटाकी येथील उत्कर्ष बालभवन, आणि सिद्धार्थ नगर मधील डॉ. कलाम बालभवन या शाळांमधील मा. सौ. रजिया दफेदार मॅडम, मा. सौ. रुबिना शेख मॅडम, मा. सौ. विणा मॅडम, आणि बालभवन स्टाफ यांचे सहकार्य लाभले. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना, युवा स्फूर्ती प्रतिष्ठान च्या माध्यमातुन सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. पप्पूशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रतिष्ठान नेहमीच वंचित घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवत असल्याचा उल्लेख करून युवा स्फूर्ती प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Categories

Comment

Comments

logo

युवास्फुर्ती प्रतिष्ठानचे आमचे ध्येय सामाजिक जाणीवेला प्रोत्साहन देणे आणि आपल्या समाजातील ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येला सक्षम करणे हे आहे जेणेकरून सकारात्मक आणि रचनात्मक बदल घडवून आणता येतील.

Recent Campaigns

YSP Location