दि. १४ कोरोना महामारीमुळे बंद असलेली शाळांची दरवाजे लवकरच उघडणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येवू नये, गरजू विद्यार्थी वर्गास शालेय साहित्याचा खर्च करावा लागू नये या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात तळागळातील विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शालेय साहित्य पुरवण्याचा निर्धार युवा स्फूर्ती प्रतिष्ठान संस्थेने केला आहे. या संदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निर्मल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड हॉस्पिटॅलिटीचे संचालक डॉ. निरंजन निर्मळ यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या उपक्रमची माहिती दिली. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी युवा स्फूर्ती प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात निर्मळ यांनी सांगितले. असे उपक्रम प्रशंसनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच सातारा येथून सुरवात होणा-या या उपक्रमाच्या शुभारंभास रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात स्वतः उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा श्री. पवार यांना भेट देण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या जास्तीत जास्त गरज विद्याथ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ साठी मोफत गणवेश, शुज व शालेय साहित्य युवा स्क्रुती प्रतिष्ठान संस्थेच्या तसेच विविध कंपन्यांच्या रिझर्व फंडातून देण्यात येणार आहे, असे
अहमदनगर : एकता,शिक्षण व आरोग्य या सर्वागांना स्पर्श करीत समाजाला सहकार्य करणारे तसेच युवास्फुर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सतत समाज उपयोगी उपक्रम राबिवणारे युवास्फुर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निरंजन निर्मळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाढी मित्र मंडळाच्या वतीने बुध रुग्णालयातील कोवीड रुग्णांना अंडी व पाणी बाँटलचे बाँक्स देण्यात आले. यावेळी रामवाढी मित्र मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील, सतीश साबळे, सुरेश वैरागर, सागर साठे, राजू दिनकर, अमोल लोखंडे, आबासाहेब गुंड, विकी तिवारी, दिपक वाघमारे, विशाल माने, गणेश ससाणे आदी उपस्थित होते.